Sunday, November 3, 2024

जीवनातील छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद सामावला आहे या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडेल. 

आयुष्यातल्या जुन्या वळणावर आनंद हरवून नवीन बदल स्वीकारून जगताना कोणीतरी अशी व्यक्ती भेटते जी आपल्याला स्व हरवलेल्या वळणावर पुन्हा नेऊन सोडते. आणि सुरु होतो प्रवास आनंदाचा..... 

अरविंद स्वामिच्या साधेपणात देखील अतिशय उत्तम नट दडलेला आहे खासकरून जेव्हा तो सकाळी अनोळखी मित्राचे नाव काय सांगणार या भीतीने जेव्हा घर सोडून जातो तेव्हा त्याच्या चेहऱयावर घाबरलेली, भेदरलेली, स्वतः बद्दल कीव अशा बऱ्याच संमिश्र भावना तरलतात आणि तो सैरवैर धावत सुटतो.... धावताना मित्राची सुटलेली चप्पल पुन्हा उराशी धरतो.... निव्वळ अप्रतिम. 


कैथी हा तर कलेची दैवी देणगी घेऊनच जन्माला आला असावा एका पात्राच्या कितीतरी बाजू तो सहजपणे दाखवत जातो. समाजात वावरताना सगळ्यांची चेष्टा मस्करी करणारा, लगेच चिडून लगेच हसणारा, गरिबीतून बाहेर पडून आयुष्याचा आनंद घेणारा, बैलावर देखील पुत्रवत प्रेम करणारा, मित्रावर मुद्दाम इम्प्रेशन मारणारा परंतु कोणत्याही परिस्थितीत साथ न सोडणार....सदैव वाहणारा आनंदाचा झरा.. प्रसंगी झालेला गुरु आणि ना जाणो आणखी कितीतरी छटा अगदी सहजतेने दाखवणारा अवलिया कलाकार म्हणजे कैथी . 

अशी या दोघांची झालेली सुरेख भेट पाहणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात नक्की डोकवायला भाग पाडेल तरी सगळ्यांनी आवर्जून पाहावा असा हा चित्रपट Meiyazhgan म्हणजेच "खरेपणा हेच माणसाचे सौंदर्य" या वाक्याला तंतोतंत जागणारा हा सिनेमा. 

सिनेमाचे श्रेय जाते ते म्हणजे लेखक दिग्दर्शक प्रेमकुमार यांना. 

सिनेमा बहरतो तो म्हणजे अगदी साध्या गोष्टीमुळे जसे कि प्राणी पक्ष्यांवरचे प्रेम, गावकडील बस मधला प्रवास, लग्नामधील पंक्तीतले जेवण, सायकल बद्दलचे इमोशन, स्वतःचे घराशी जोडलेले भावनिक नातं अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला नॉस्टॅल्जिक केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा नक्की द्या स्वतःला एक ट्रीट आणि पहा Meiyazhgan. #Meiyazhagan #kaithi #ArvindSwamy

जीवनातील छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद सामावला आहे या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडेल.  आयुष्यातल्या जुन्या वळण...