रस्त्याच्या कडेने सायकलवरुन गवताच्या पेंढ्या घेऊन जाणारा सायकलवाला, तंबाखु कारखान्यातुन घरी जाणारे कामगार, तुरळक मोटार सायकली तसेच खद्खद करत जाणारा ट्रॅक्टर व आजुबाजुच्या घरांच्या धुराडयांमधुन येणारा धुर बघत असताना मला चाहुल लागली ती अमळनेरची, अमळनेर तालुक्याचे गांव इतर तालुक्यांप्रमाणे शहराचे आणी गावाचे समन्वय साधणारया व गावाकडील वातावरणाची गोडी आणी शहराची चाहुल असलेल्या अमळनेर मधे गाडीने प्रवेश केला होता पैलाड मधे.
पैलाड पुर्णपणे गावासारखेच नदीच्या पैल तीरावर असल्यामुळे त्याला "पैलाड" म्हणत. मारुतीचे मंदिर, मातीची व शेणाने सारवलेली बैठी घरे आणी गुरे ढोरे यांच्यामधुन गाडीने रस्ता काढत गाडी आली ती बोरी नदीच्या पुलावर पुल तसा अरुंदच परंतु शहरात प्रवेश करण्याचा जणु राजमार्गच त्या राजमार्गावर गाडी थांबली ती दगडी दरवाज्याजवळ गाडीतुन उतरलो ते त्या भव्य दगडी दरवाजाकडे बघत बघत आतमधे गेल्यावर सरळ रस्ता धरला तो वाडी चौकाचा तीथे गेल्यावर मंदिरामधे दर्शन घेऊन वसतीगृह गाठले "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह" समोरील पाटि वाचत आत प्रवेश केला.
दोन मजली असलेले ते वसतीगृह अगदी नदीच्या काठावर असल्यामुळे वसतीगृहतुन काही खाली टाकल्यास ते अगदी थेट नदीमध्ये पडत असे अंदाजे शंभर फ़ुट लांबलचक असलेली ती वास्तू एका नजरेत मावण्यासाठी तीला दुरून बघण्यावाचून पर्याय नसे. पावसळ्यात नदिचे पाणी वसतीगृहात येऊ नये म्हणुन बारा ते पंधरा फ़ुट पाया बांधुन त्यावर ती ईमारत उभारलेली होती त्यामुळे ती अजुनच भव्य वाटत असे.
दारातच कार्यालयाच्या बाहेर स्टुलावर कडक ईस्त्रीचे कपडे, डोक्यावरील विरळ केस असलेल्या परंतु गुळगुळीत दाढी घोटलेल्या इसमाला वडीलांनी विचारले "साहेब आहेत का आतमधे" तंबाखू मळत मळत तीरका कटाक्ष टाकत फ़क्त मान हलवत त्याने परवानगी दिली आणी आम्ही कार्यालयात शिरलो.
वडिलांनी आधीच येऊन प्रवेश घेऊन ठेवला असल्यामुळे ते मला सोडवायला आले होते.
"आधिक्षक" मी टेबलावर ठेवलेली नाव वाचत असताना माझे वडील "नमस्कार साहेब... मुलाला वसतीगृहात दाखला मिळाला आहे त्याला सोडवायला आलो होतो".
जाडसर मिश्या केस परतीच्या मार्गावर असल्यागत कमी कमी होत गेलेले, चाळीशीच्या आसपास असलेले आणी एखाद्या साहेबाप्रमाणे रुबाबदर पोशाख केलेला आधिक्षकांनी चश्मा काढत रुक्ष स्वरात विचारले........नाव
एका स्वरात वडिल म्हणाले मी शांताराम आहिरे आणी हा माझा मुलगा गणेश.
आधिक्षक माझ्याकडे बघत...."आधी कुठे शिकत होतास"?
पुण्याला......मी
पुण्यासारखे विद्येचे माहेर घर सोडुन इकडे कसे काय?
आम्ही पुणे सोडुन गावी रहायला आलो आहोत पण गावापेक्षा इथले शिक्षण चांगले आहे म्हणुन मुलाला इकडे भरती केले वडिलांनी सांगीतले
साहेबांनी परत चश्मा पुर्ववत करत कसले तरी रजिस्टर काढुन त्याच्यवरुन नजर फिरवली.
दाखला झाला आहे.... वसतीगृहातर्फ़े बिछाना दिला जाईल तो वर्षाखेरीस परत जमा करवा लागेल तसेच हे वसतीगृह शासकीय असल्या कारणाने दर महीन्याला रूपये पंचवीस देण्यात येतील परंतु कसलीही तक्रार येता कामा नये असा आदेश वजा सूचना करुन करडया आवजात आधिक्षकांनी "पिंजारी........" अशी मोठयाने हाक मारली.
बाहेर बसलेला इसम..........जी साहेब करत आला
यांना बिछाना द्या आणी रूम दाखवा तसेच इथले नियम समजावून सांगा.
हो साहेब.
धन्यवाद साहेब नमस्कार येतो म्हणून वडिलांनी साहेबांचा निरोप घेतला.
पिंजारी हा वसतीगृहातील शिपाई होता.
एका कपाटतुन बिछाना काढुन दिल्यावर "उचला तो आणी चला माझ्यामागे" म्हणत आम्ही त्याच्या मागे चालु लागलो.
एक नंबरच्या खोलीचा वापर कार्यालय म्हणून करण्यात आला होता शेजारी दोन, तीन व चार नंबरच्या खोल्या विद्यार्थांसाठी होत्या. पाच नंबरच्या खोलीचा वापर स्वयंपाक घर म्हणुन केला जाई त्या शेजारच्या सहा नंबरच्या खोलीत सर्व खानसामा ठेवला असे. आणी त्याला लागूनच दुसरया मजल्यावर जाण्यासाठी छोटासा जीना होता. आणि सात नंबर खोली च्या शेजारी आंघोळीची जागा होती.
तसेच उरलेल्या आठ खोल्या वरील मजल्यावर होत्या.
इथली पदधत मजेशीर होती जो कोणी नविन मुलगा येई त्याला अगदी शेवटची खोली देण्यात येई आणी जसा तो मुलगा वरच्या वर्गात जाई तशी त्याला अलीकडची खोली मिळत असे. जशी काहि एखाद्या साहेबाची बढती झाल्यागत या नियमाप्रमाणे दोन नंबरच्या खोलीत सिनीयर अथवा जुने विद्यार्थि राहत असत.
याप्रमाणे मला पंधरा नंबरच्या खोलीत पिंजारींनी नेले आणी खोली दाखवून तो निघून गेला