दिवस मैत्रीचे....!!
“सरली वर्षे, जमल्या आठवणी, जोडलीत अतुट नाती
उत्सव करुयात मिळुनी सारे, मित्रची माझे सांगाती "
प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून त्याच्या आयुष्यात
नवनवीन कौटुंबीक नाती आपोआप तयार होत जातात....
परंतु प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार एक नवीन नाते
जोडता येते ते म्हणजे मैत्रीचे...
आणी अशा या सुंदर नात्याची सुरुवात होते ती म्हणजे शाळा
कॉलेज मधे.. अशा या मैत्रीसाठी कोणत्याही अटी शर्तीची
गरज भासत नसते सवयी जुळल्याने, मतं जुळल्याने किंवा
मनं जुळल्याने...... असे हे मनाच्या अगदी जवळचे नाते
म्हणजे मैत्री, मित्र, सखा, सोबती किंवा दोस्त....
अशाच एका भन्नाट मैत्रीची सुरुवात झाली ती सन
1997 साली श्री शाहु मंदिर महाविद्यालय येथे
शाळेतला अल्लडपणा व दहावीचे दिव्य पार करून तारुण्याची
चाहुल लागलेली असताना कॉलेजच्या उंबरठ्यावर येऊन
पोहोचलेले बावरलेले नवीन चेहरे कॉलेजच्या त्या नवीन
वातावरणात एकमेकांसोबत मिसळुन कधी ओळखी निर्माण
झाल्या हे त्यांना देखील उमगले नाही...
आणी ओळखीचे मैत्रीत रुपांतर व्हायला वेळ लागतो
तो कीतीसा...
निस्वार्थता, आदर, आणी एकमेकांची गरज ओळखता
आलो तर मैत्री फुलायला वेळ लागत नाही....
ही नवीन मैत्री या सर्वांच्या आयुष्यात एक सोनेरी पर्व
घेऊन आली. सन 1997 मधील तो पावसाळा
घेऊन आला नवीन आनंद, नवीन उर्जा आणी एक
नवीन सुरुवात..... सायकलींवर एकत्र कॉलेजला
जाणे, क्लासरूम मधे SP, OC, Economics आणी Accounts
च्या वह्या भरवणे, कॅटिनमधे जाऊन वडापाव / पॅटीस
रवाणे, लायब्ररी मधील पुस्तकांची देवाण घेवाण करणे, फावल्या
वेळात ग्राउंडवर खेळणे, मित्रांची चेष्टा मस्करी करणे
हसणे खिदळणे, तसेच कधीतरी off Periods ला
सिनेमा पहायला जाणे अशा प्रकारचे स्वातंत्र्य सगळ्यांच्या
आयुष्यात एक उनाडपण घेऊन आले.....
हाच उनाडपणा देऊन गेली एक घट्ट जिवा भावाची मैत्री आयुष्यभरासाठी....
यांच्या या मैत्रीला जोडणारा
अजुन एक समान धागा होता तो म्हणजे खेळाचे मैदान
मिळेल तसा वेळ काढून ग्राउंड वर क्रिकेट व फुटबॉल खेळणे
हाच यांचा दिनक्रम झालेला. उन, वारा, पाऊस देखिल
यांना यांच्या खेळण्यापासुन अडवु शकला नाही...
मनसोक्त खेळुन दमल्यानंतर कँटीन मधील तो
फिका चहा देखील समाधान देऊन जात असे.....
११ वो १२ वी नंतर सिनियर कॉलेजला गेल्यावर तो
गोकवडी व कुजगावचा कॅम्प सदैव आठवणीत राहणारा
असाच होता....
मैत्री मधे एक हुरहुर कायम असते ती म्हणजे
मित्राला परत कधी भेटणार याची........ त्यामुळे कॉलेज मधुन
घरी गेल्यावर संध्याकाळी एकमेकांना हे भेटत असत
कधी चायनिज खायला, तरी कधी अभ्यासाला तर
कधी गप्पा मारायला...
अन जर सुट्टी असेल तर मिळेल त्याची मोटारसायकल
घेऊन, खेड शिवापुर, बनेश्वर, भुलेश्वर, खडकवासला
किंवा सिंहगडला फिरायला जात असत..
परीक्षेच्या काळात मित्रांच्या घरी किंवा कॉलेजवर रात्रभर
जागुन केलेल्या अभ्यासामुळे हे सगळे मित्र परीक्षा पास होत गेले आणी पुढे जात
राहीले....
त्या पडत्या काळात यांचा एक मित्रच यांचा गुरु झाला
तो म्हणजे सर धनजय बापट कशाचीही अपेक्षा न ठेवता
तो शिकवत गेला सगळी मुले पास होत गेली......
तसाच दोन वर्ग पुढे असलेला प्रवीण जाधव म्हणजेच नाना सगळ्यांमधे
मिसळुन सर्वांचा मोठा भाऊ झाला तो आजतागायत.......
कॉलेजच्या त्या दिवसांमधे सगळे मित्र साधारण कुटुंबामधुन
आलेलो होती त्यामुळे बऱ्याच जणांचा खिसा बरयापैकी रिकामा असे
अशा वेळेस आमचे कँटींन चे बिल भरणारा महेंद्र शिंदे म्हणजेच सगळ्यांचा
लाडका मुन्ना भाऊ झाला तो कायमचाच.....
तसेच वेळोवेळी सगळ्यांना सांभाळुन घेणारा कौस्तुभ, संजय, भरत, आणी रविंद्र देखील
असाच एक आर्टर्स चा विद्यार्थी राहुल लोढे बाकीच्यांबरोबर
म्हणजेच (रूपेश, केदार, राहुल येळवेकर
विशाल, उमेश, राहुल जाधव, विक्रम,
लोकेश, अमोल लिमण, गणेश नलावडे, योगेश,
अमित, अनिल चव्हाण, शशिकांत, अनिल लकडे,
अमर, नितीन, संभाजी, अमोल शिर्के,
अनिरुध्द, जायभाय, यांच्या
सोबत हळुवारपणे विरघळुन गेला.....
सगळे हे मित्र आजदेखिल एकत्र व एकसंघ आहेत याचा
सर्वांनाच अभिमान आहे......
कॉलेजमधे सुरु झालेल्या सहलींचा प्रघात आजदेखिल
अखंडितपणे चालु आहेच....
कॉलेज संपल्यानंतर राहुल जाधवच्या वडिलांची बदली
कोल्हापुरला झाली कारणाने सगळे मित्र त्यांना सोडवायला कोल्हापुरला
गेले होते…. कोल्हापुरच्या त्या आठवणीत सगळे आजही देखील रमतात.
नंतर सुरू झाला तो सगळ्यांच्या संघर्षाचा काळ प्रत्येकजण काम
मिळवण्यासाठी खटाटोप करू लागला, प्रत्येक जण
मिळेल तसे काम करत आयुष्यात पुढे सरकत होता. परंतु
या संघर्षाच्या काळात देखिल या मित्रांनी एकमेकांची
साथ कधी सोडली नाही. एकमेकांना मदत करत सगळेजण
आयुष्यात सेटल होत स्थिरावत होते....
अशातच एक एक मित्र लग्नाच्या बेडीत अडकु लागला..अशाच एका
मित्राने देखिल कॉलेजमधेच त्याच्या आयुष्याची
जोडीदारीण मिळवली आणी हो जोडी होती मुन्ना आणी
विनुची या दोघांचा जोडी म्हणजे जन्मोजन्मीच नातेच जणु....
त्यानंतर सुरू झालेली सगळ्यांच्या लग्नांच्या मालिकेचा
शेवट Mr. आणी MRS. मोरे या जोडप्याने केला...
दिवस पुढे सरकत होते. लग्नानंतर सगळ्याचे संसार फुलत
गेले तरी तेव्हा ही सगळे भेटतच राहीले ते म्हणजे खेळाच्या
मैदानावर....
स्वतः पुरते आयुष्य न जगता आपण समाजाचे देखिल
देणे लागतो या भावनेतून सर्व मित्रांनी एकत्र येऊन
सामाजिक उपक्रम देखिल राबविले....
समाजातील दुखी: कष्टी लोकांना आपलीच माणसं समजून
“आपली माणसं” या नावाखाली आश्रमशाळेला मदत करणे
शाळेतील मुलांची फी भरणे तसेच शालेय साहित्य पुरवणे
असे विविध उपक्रम राबवत सगळ्यांची मैत्री बहुअंगानी
फुलत गेली.....
यांच्या मैत्रीच्या सुख:द प्रवासामधे प्रत्येकाच्या आयुष्यात
दुःखाचे देखिल प्रसंग आले, जसे की जो कोणी हॉस्पीटल
मधे अॅडमीट असेल तर सगळे एकदम धावुन जात.
मग त्या मित्रांजवळ थांबणे असो, काय हवे नको ते पाहणे,
पैसे उभे करणे असो वा आणखी काही हे सगळे मित्र
कशातच कमी पडले नाहीत..... एकमेकांच्या घरचे कोणी
अॅडमिट असोत वा कोणाचे नातेवाईक हे सगळे वेळोवेळी
मदतीसाठी नेहमी पुढे सरसावलेत....
तसे मैत्रीचे दाखले कितीतरी महान आहेत जशी श्रीकृष्ण
आणी सुदामाची मैत्री, वाईट परिस्थितीत देखिल साथ न
सोडणाऱ्या कर्णाची मैत्री तशीच आजच्या या आधुनिक
काळातील या सगळ्यांची मैत्री देखील वारवाणण्या सारखीच आहे...
मला स्वतःला तरी असे वाटते की यांची मैत्री 25 वर्षे
टिकुन ठेवण्यास दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत.....
त्या म्हणजे एक म्हणजे खेळाचे मैदान आणी दुसरी म्हणजे कोकणातील सहल
या दोन धाग्यांनी गुंफत मैत्रीचा मजबूत दोरखंड सगळ्यांनी मिळुन विणला....
मला खात्री आहे की माझ्यासारखाच सगळ्यांच्या घरच्यांना हा देखील
प्रश्न नेहमीच पडत असावा की हे सगळे दरवर्षी सहलीसाठी
एकाच ठीकाणी का जात असतील तर यांनी सांगितले की.....
"आम्ही सगळे फिरण्यासाठी सहलीला जात नाही, आम्ही जातो ते
जुन्या आठवणी जपण्यासाठी आणी नविन आठवणी निर्माण
करण्यासाठी.....”
सगळे मित्र असेच सदैव एकदिलाने,
एकमताने कायम एकसंध राहोत व आपल्या घरातल्या थोरामोठ्यांचे
आशिर्वाद कायम आपल्या पाठीशी राहोत हीच बाप्पा चरणी अगदी
मनापासून प्रार्थना.
धन्यवाद.....!!